Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एमपीएससी तिसऱ्या प्रयत्नात राज्यात पहिला

Webdunia
बुधवार, 5 जुलै 2023 (08:01 IST)
एमपीएससी आयोगाने पीएसआय पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर केला. यात ५८३ युवकांची निवड केली. सुनील खचकड हा पहिला आला. सुनीलने शहरातील औरंगपुरा भागात पाच वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती. वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सुनीलचे वडील शेतकरी आहेत. त्याने कला शाखेत पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतला होता.
 
२०१८, २०१९ साली झालेल्या पीएसआय पदाच्या परीक्षेत थोडक्यात यशाने हुलकावणी दिली. मात्र, त्याने तिसऱ्या प्रयत्नात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. निकाल जाहीर झाला तेव्हा सुनील गावी गेलेला असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत मित्रांनी जल्लोष साजरा केला. सुनील याला एक भाऊ असून तो सुद्धा स्पर्धा परीक्षेचीच तयारी करीत असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली.
 
परीक्षेच्या ५४० पैकी ४२७ गुण
 
सुनील याने पीएसआय पदासाठीच्या परीक्षेत एकुण ५४० गुणांपैकी ४२७ गुण प्राप्त झाले आहेत. त्याला लेखी परीक्षेत ४०० पैकी ३१३ गुण, शारीरिक चाचणी परीक्षेत १०० पैकी ८७ गुण आणि मुलाखतीत ४० पैकी २७ गुण मिळाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

नवीन

आठ महिन्यांच्या मुलीला माहेरी घेऊन जाण्यावरून वाद, सासऱ्याने धक्का दिल्याने सुनेचा मृत्यू

बीसीसीआयने श्रीलंका मालिकेपूर्वी सुभदीप घोष यांची नवीन फील्डिंग कोच म्हणून नियुक्ती केली

LIVE: महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा लागू

तीन राज्यांमधील विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांसाठी आज मतमोजणी सुरू झाली

सहरसा मध्ये चालत्या ट्रेनला भीषण आग, प्रवाशांनी मारली उडी

पुढील लेख
Show comments