Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई BMW अपघात : कार चालकाविरुद्ध लूक आउट सर्कुलर घोषित, काय म्हणाले सीएम शिंदे

Webdunia
सोमवार, 8 जुलै 2024 (13:43 IST)
मुंबई पोलिसांनी 24 वर्षीय तरुणाविरोधात एक लूक आउट सर्कुलर घोषित केला आहे. ज्याने वर्ली परिसरात एका महिलेला bmw कारने धडक दिली होती. एका अधिकारींनी सोमवारी ही माहिती दिली की, या घटनेमध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोपी पालघरजिल्ह्यातील शिवसेना नेता राजेश शाह यांचा मुलगा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत रविवारी सांगितले होते की, कायद्याच्या नजरेत सर्व एक आहेत. तसेच कोणालाही माफी आली जाणार नाही. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ली कोळीवाडा निवासी कावेरी नाखवा वय 45 रविवारी सकाळी 5.30 ला आपल्या पतीसोबत डॉ. एनी बसेन्ट मार्गावरून जात होत्या. तेव्हाच bmw चालवत असलेल्या मिहीर शाह ने या दांपत्याच्या दुचाकीला धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार महिला कार सोबत 2 किलोमीटर घसरत गेली. ज्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. वर्ली पोलिसांनी आरोपीचे वडील राजेश शाह आणि ड्राइव्हर बीदावत ला मिहीरला फरार होण्याकरिता मदत केली म्हणून रविवारी या दोघांना अटक केली आहे. हा आरोपी देश सोडून फरार होऊ शकतो म्हणून पोलिसांनी रविवारी संध्याकाळी त्याच्या विरोधात एलओसी घोषित केली आहे.  
 
महाष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे म्हणाले की, कायद्याच्या नजरेत सर्व एकसमानआहे. व सर्व कारवाई कायद्यानुसार करण्यात येईल. कोणालाही माफी दिली जाणार नाही. शिंदे म्हणाले की पोलीस कोणालाही सोडणार नाही. मुंबई अपघात दुर्भाग्यपूर्ण आहे. मी कडक कारवाई करीत पोलिसांशी चर्चा केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

सरकार बनताच 'लाडक्या बहिणींना' मिळणार 2100 रुपये-अमित शाह

महाराष्ट्रात निवडणूक उड्डाण पथकाने गाडी अडवून व्यावसायिकाकडून पैसे उकळले, 2 पोलिसांसह 5 जणांविरुद्ध एफआयआर

पुढील लेख
Show comments