Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कौतुकास्पद, ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी गुरुद्वाराने धार्मिक कार्यक्रमात वाटले दहा हजार हेडफोन्स

Mumbai Gurudwara distributes 10k headphones to devotees
कौतुक करावे अशी गोष्ट मुंबईतील एका गुरुद्वाराने केली आहे. ध्वनी प्रदूषण कमी व्हावं, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र त्याची सुरुवात इतरांपासून व्हावी, असं वाटणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. मात्र  उल्हासनगरमधल्या एका गुरुद्वाऱ्याच्या बाबतीत वेगळच  घडल आहे.  सत्संगावेळी होणारं ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी गुरुद्वाऱ्यानं स्तुत्य पाऊल उचलल असून अभिनव उपक्रमाचं मुंबई उच्च न्यायालयानंदेखील तोंडभरुन कौतुक केलं आहे. 
 
उल्हासनगरमधील गुरुद्वाऱ्याच्या अमृतवेला ट्रस्टनं 43 दिवसांच्या सत्संगाचं आयोजन केलं,  गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं आयोजित सत्संग किर्तनात हजारो शीख बांधव उपस्थित होते. यावेळी ध्वनीक्षेपक लावण्यात येणार होता. मात्र त्यामुळे होणारं ध्वनी प्रदूषण लक्षात घेता ट्रस्टनं तब्बल 10 हजार हेडफोन्सचं वाटप केल होते, त्यामुळे कोणत्याही ध्वनी प्रदूषणाशिवाय सत्संग अगदी उत्तमपणे संपन्न झाला आहे. एक अनोख अस उदाहरण गुरुद्वाराने घालवून दिले आहे. गुरुद्वारा ट्रस्टनं घेतलेल्या या निर्णयाचं मुंबई उच्च न्यायालयानं खूप कौतुक देखील  केलं आहे.उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे न्यायालयानं महापालिका आणि आयुक्तांचीही स्तुती केली. 
 
जर 99 टक्के अधिकारी नियमांच्या चौकटीत राहून काम करत नसतील, तर नियमाच्या अधीन राहून उत्तमपणे स्वत:ची जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचं कौतुक व्हायला हवं, असं उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं म्हटल आहे. त्यामुळे देशातील इतर ठिकाणी मोठ्या आवाजात लोकांना त्रास होईल अश्या पद्धतीने जे धार्मिक कार्यक्रम होतात त्यांच्यासमोर एक मोठा आदर्श ठेवला गेला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतकरी कर्जमाफी झाली का - आदित्य ठाकरे