Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खासगी गाडीवर पोलीस लिहिले तर होणार कारवाई, हायकोर्टाचा निर्णय

Webdunia
बुधवार, 26 जून 2019 (16:43 IST)
मुंबई पोलीस, ट्राफिक पोलीस यांना त्यांच्या खासगी गाडीवर पोलिस  लिहणे आणि तसा लोगो लावण्यास हायकोर्टाने पूर्ण बंदी घातली असून, जर अशी पाटी लावली तर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०१३ च्या कलम १३४ प्रमाणे संबंधीतावर कारवाई केली जाणार आहे. अनेक पोलीस आपल्या खासगी गाडीवर पोलीस किंवा लोगो लावतात तर त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी सुद्धा असे गाडीवर टाकतात. कारण त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी याचा वापर केला जातो. मात्र, आता या पुढे मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना आपल्या खासगी गाडीवर पोलीस किंवा लोगो लावता येणार नाही. जर अशी पाटी लावलेली दिसली तर सबंधीतावर लगेच  कारवाई करण्यात येणार आहे. हायकोर्टाने पोलिसांना आदेश दिले असून येत्या सात दिवसात कोणावर कारवाई केली याचा अहवाल देखील ट्राफिक  मुख्यालयात सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांकडूनच पोलिसांवर कारवाई होताना पहायला मिळणार आहे. मात्र, वाहतूक पोलीस पाटी लावलेल्या वाहनांवर कारवाई करणार का असा प्रश्न आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: तिरंगा यात्रेत हिंदुस्थान झिंदाबादने भांडुप गुंजला

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

धबधब्यामध्ये आंघोळ करणे चार डॉक्टरांना महागात पडले, एकाचा बुडून मृत्यू

भारतात कोविड परतला, मुंबईत कर्करोग आणि किडनीच्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

पुढील लेख
Show comments