Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

महापौरपदाची सोडत : 27 पैकी 14 महापालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव

महापौरपदाची सोडत :  27 पैकी 14 महापालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव
, शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017 (14:25 IST)
महापालिका महापौरपदाची सोडत जाहीर झाली आहे. 27 पैकी 14 महापालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मुंबईचे महापौरपद खुल्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. तर नाशिकचे महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे.
* सरकारच्या नियमानुसार
अनुसूचित जमाती – 1 जागा आरक्षित, अनुसूचित जाती – 3 जागा आरक्षित, त्यात 1 सर्वसाधारण 2 महिला, इतर मागासवर्गीय – 7 जागा आरक्षित, त्यात 4 महिला 3 सर्वसाधारण
खुला गट – 16 जागा, त्यापैकी 8 महिला 8 सर्वसाधारण.
 
* अनुसूचित जमातीसाठी 1 तर जातीसाठी 3 महापालिका आरक्षित
नाशिक महापौर : अनुसूचित जमाती, पनवेल : अनुसूचित जाती (महिला), नांदेड वाघाळा : अनुसूचित जाती (महिला), अमरावती : अनुसूचित जाती.
 
* इतर मागास प्रवर्गासाठी 7 महापालिका आरक्षित (4 महिला 3 साधारण)
मीरा भाईंदर : ओबीसी महिला, नवी मुंबई : सर्वसाधारण, पिंपरी चिंचवड : सर्वसाधारण, सांगली मिरज कुपवड : ओबीसी महिला, जळगाव : ओबीसी महिला, औरंगाबाद : सर्वसाधारण
चंद्रपूर : ओबीसी महिला.
 
* खुल्या प्रवर्गासाठी 16 महापालिका आरक्षित (महिला 8, साधारण 8)
मुंबई : खुला साधारण, वसई विरार : खुला साधारण, भिवंडी : खुला साधारण, लातूर : खुला साधारण, मालेगाव : खुला साधारण, धुळे : खुला साधारण, अकोला : खुला साधारण
अहमदनगर : खुला साधारण, ठाणे : खुला प्रवर्ग महिला, कल्याण डोंबिवली : खुला प्रवर्ग महिला, पुणे : खुला प्रवर्ग महिला, उल्हासनगर : खुला प्रवर्ग महिला, परभणी : खुला प्रवर्ग महिला
सोलापूर : खुला प्रवर्ग महिला, कोल्हापूर : खुला प्रवर्ग महिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

UP: रिचार्ज शॉपवर 50 आणि 500 रुपयांमध्ये विकण्यात येत मुलींचे नंबर