Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई पोलीसांकडून पुन्हा एकदा गिरणा नदीपात्रात ड्रग्जचा शोध सुरु

Webdunia
सोमवार, 30 ऑक्टोबर 2023 (08:25 IST)
नाशिक ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावादरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पात्रातील ड्रग्जचा मोठा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती समोर आली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गिरणा नदी गाठत तब्बल दहा ते बारा तास शोधमोहीम राबवण्यात आली होती. परंतु तेव्हा नदी पात्रामध्ये पाणी जास्त असल्याने त्यांना ही शोधमोहिम थांबवावी लागली होती.
 
मात्र रविवारी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांची टीम गिरणा नदी पात्राच्या ठिकाणी पोहोचली असून पुन्हा एकदा शोध मोहिमेला सुरुवात केली. यावेळी गिरणा नदी पात्राची पाणी पातळी कमी करण्यात आली असून लोहोणेर ठेंगोडा येथील बंधाऱ्याचे गेट खुले करुन पाणी पातळी कमी करण्यात आली आहे. यासाठी मुंबई पोलीस आणि जलसंपदा विभाग यांच्यात पाणी सोडण्याबाबत पत्रव्यवहार झाल्याचे समोर येत आहे.
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा साथीदार सचिन वाघ याने नाशिकच्या कारखान्यात बनवण्यात आलेले ड्रग्ज हे नष्ट करण्याच्या उद्देशाने लोहोणेर तालुक्यातील ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रात फेकून दिले होते. सचिन वाघ याची चौकशी करताना मुंबई पोलिसांना त्याने ही माहिती दिली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार सरस्वतीवाडी येथे खड्डा खोदून त्यात कोट्यावधींचे ड्रग्ज लपवल्याची माहिती त्याने मुंबई पोलीसांना दिली होती.
 
त्यानुसार मुंबई पोलिसांनी ठेंगोडा गावाजवळील गिरणा नदीपात्रात शोधमोहीम राबवली, ज्यात मुंबई पोलिसांना अंदाजे 40 ते 50 किलोच्या ड्रग्जच्या दोन गोण्या आढळून आल्या होत्या. मात्र नदीतील पाण्याची पातळी जास्त असल्याने यापूर्वी ही मोहीम थांबवण्यात आली होती. मात्र आता जलसंपदा विभागाकडून नदीतील पाणी पातळी कमी केल्याने पुन्हा एकदा या शोध मोहीमेला सुरुवात करण्यात आली आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुस्लिम अभिनेते आणि अभिनेत्रींच्या बहिष्कारावर संजय निरुपम यांनीही प्रतिक्रिया दिली

LIVE: मुंबई गुन्हे शाखेने ४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले

ट्रम्प यांच्या दाव्यावर संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला

नागपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'तिरंगा रॅली'चे केले नेतृत्व

Pakistani spy आठवी पास सिक्योरिटी गार्ड, ISI एजंट... कोण आहे नोमान इलाही ? ज्याने देशाविरुद्ध कट रचला

पुढील लेख
Show comments