Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

सोनाई तिहेरी हत्याकांड प्रकरण पाच आरोपींना फाशी कायम एकाची सुटका

सोनाई तिहेरी हत्याकांड प्रकरण पाच आरोपींना फाशी कायम एकाची सुटका
पूर्ण राज्याला हादरवून टाकणार्या सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी सहा पैकी पाच दोषी आरोपींची फाशी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. तर सदर प्रकरणातील सहावा आरोपी अशोक नवगिरेला निर्दोष मुक्त केले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई गावच्या गणेशवाडीतील पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले यांची मुलगी आणि सफाई कामगार म्हणून काम करणार्या मेहतर समाजातील सचिन घारूसोबत तिची मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. याबाबतची माहिती दरंदले कुटुंबाला समजताच त्यांनी त्यांना जीवे मारण्याचा कट रचला.

पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले, त्यांचे चुलत बंधू रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले, गणेश रघुनाथ दरंदले (मुलीचा भाऊ), संदीप माधव कुर्हे (मुलीटा मावसभाऊ), त्यांचे नातेवाईक अशोक रोहिदास फलके व अशोक सुधाकर नवगिरे यांनी १ जानेवारी २०१३ रोजी सोनाईतील नेवासा फाटा इथे सेपÌटी टँक दुरुस्तीचा बहाणा करून सचिन, संदीप आणि राहुल यांना बोलावले आणि त्यांची निघÉर्ण हत्या केली. यावेUी संदीप धनवारला सेपÌटी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून मारण्यात आले. तर तिथून पUून जाणाच्या प्रयत्न करणा‚या राहुल कंडारे याचा कोयत्याने वार करून तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये घालून खून करण्यात आला आल्याचे पोलीसांच्या तपासातून समोर आले.साक्षीदारांवर दबाव येऊ नये यासाठी नेवासा सत्र न्यायालयात सुरू असलेला हा खटला नाशिक न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिलं होतं. या खटल्यात एकूण ५३ साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली होती. तेव्हा, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा खटाल दुर्मिUात दुर्मिU असल्याचे स्पष्ट करत ७ पैकी ६ आरोपींना दोषी ठरवले. तर अशोक फलके या आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर पोपट दरंदले, प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, गणेश दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुर्हे या दोषींनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले तर फाशीची शिक्षा कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने याचिका केली होती. त्यावर सोमवारी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. संदिप शिंदे यांच्या खंडपीठाने आपला निर्णय जाहीर केला. त्यात पाच आरोपींची फाशी कायम ठेवत खंडपीठाने नवगिरे पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले नवगिरे यांच्यावतीने अ@ड. नितीन सातपुते यांनी युक्तीवाद केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'या' खातेदारांना सर्व पैसे काढायची मुभा मिळाली