सध्या मुंबईकरांवर पाण्याची टंचाई आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा जवळपास 32.32 टक्क्यांवर खाली आला आहे. या धरणांत दोन महिना पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. जून यामध्ये पुरेसा पाऊस आला नाही तर जुलै पर्यंत पाणी पुरवण्याचे आव्हान महापालिकेसमोर उभे राहील. मुंबईच्या सात ही धरणात आता 32.32 टक्के पाणी आहे. मुंबईला दररोज 3,800 दशलक्ष लिटरचा पाणी पुरवठा होतो.
त्यानुसार धरणात दोन महिने पुरेल एवढेच पाणीसाठा आहे. सध्या उकाडा वाढला असून उन्हाच्या झळा बसत असून पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असते. जून मध्ये पुरेसा पाउस पडल्यावर पाण्याचा साठा जुलै पर्यंत पुरतो. मुंबईकरांना एक टक्के पाणी तीन दिवस पुरतो. मात्र उन्हाळा सुरु झाल्यावर पाण्याचा साठा कमी होणार. मार्च महिन्यात मुंबई पालिकेने पहिल्याच दिवशी राज्य सरकारला राखीव साठ्यातून पाणी मिळावं या साठी पत्र लिहून मागणी केली होती. मार्चच्या सुरवातीच्या महिन्यात पाण्याच्या साठा ४२ टक्के होता. आता ३२ टक्के च आहे. मुबईकरांना पाण्याची गरज पडल्यास भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी वापरले जाईल .
मुंबईत यंदाच्या वर्षी देखील धुळवड अति उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबईकरांनी रंगासोबतच पाण्याचा वापर सरदार केला गेला. अएक ठिकाणी होळीच्या कार्यक्रमात हजारो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली.