Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंडे भगिनी नितीन गडकरी यांच्या भेटीला

Munde to meet sister Nitin Gadkari Maharashtra News Regional Marathi News Webdunia Marathi
, बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (16:44 IST)
भाजप नेत्या पंकजा मुंडे  आणि खासदार प्रीतम मुंडे या भगिनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी  यांची भेट घेतली आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही दिल्लीत आहेत. त्यामुळे या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मुंडे भगिनींनी नितीन गडकरी यांची भेट घेतल्याने चर्चा होत आहे. दरम्यान, ही भेट बीड जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात होती अशी माहिती देण्यात आली आहे.
 
मुंडे भगिनींनी नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतल्याने चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या भेटीनंतर आता पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चा अधिक रंगली होती. मात्र, बीड जिल्ह्यातील विकास कामांसंदर्भात ही भेट असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. त्याचवेळी त्या म्हणाल्या, अमित शाहांच्या मिटींगमध्ये मी नव्हते. मला काही सांगायचे असेल तर मी अमित शाह यांना भेटेन. 
 
बीड जिल्ह्यातील विकास कामा संदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेतली. मतदारसंघातील कामांबाबत ही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. गडकरी यांनी परळी जिल्ह्याला भरभरून दिले आहे. त्याबद्दल त्यांचे आभारही मानले. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले, सैफ चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर संघाचे पुढील लक्ष्य काय आहे