Dharma Sangrah

उपराजधानीत युवकाचा हात पाय बांधून खून नागपूर हादरले

Webdunia
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019 (15:18 IST)
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. डोबी नगर येथे हा खून झाला आहे. या थरारक हत्येमुळे परिसरात खळबळ उडली असून नागरिक भयभीत झाले आहेत. मृतकाची ओळख पटली नसून हत्येच कारणही अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या हत्येचा अधिक तपास करत आहेत.
 
ही हत्या काल (8 ऑगस्ट) रात्री झाली आहे असे पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. यातील भयानक गोष्ट म्हणजे मृत युवकाचे हात पाय बांधून गळा कापण्यात आला आहे. या धक्कादायक हत्येमुळे परिसरात भीतीच वातावरण पसरले आहे. हत्या कुणी केली? का केली? याचा शोध अजनी पोलीस घेत आहेत.
 
मागील काही दिवस नागपूरमधील गुन्ह्यांत भयानक वाढ होत आहे. मागील महिन्यात नागपूरमध्ये एका मॉडलची निर्घुण हत्या करण्यात आली होती. ही हत्या तिच्या प्रियकराने केली असल्याचे समोर आलं होतं. प्रेयसीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरुन प्रियकराने तिचा खून केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असल्याने या हत्या आणि इतर बेकायदा कामे रोखण्याचे पोलिसांपुढे मोठे आवाहन आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: लाडकी बहीण योजना: eKYC ची अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवली

जालनामध्ये काँग्रेसकडून मोठी कारवाई: ७ नगरसेवक निलंबित

गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे आता एकाच पानावर! महाराष्ट्र राज्य बोर्डाने अनेक दशके जुना नियम बदलला

Bank Holiday:या महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील जाणून घ्या

सुनेने सासऱ्याच्या गुप्तांगावर लाथ मारली, जागीच मृत्यू

पुढील लेख
Show comments