Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवसाढवळ्या युवकाची हत्या; दोन जण ताब्यात

Webdunia
सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (16:03 IST)
जुन्या भांडणातून रविवारी (दि.३१) दुपारी ३ वाजेदरम्यान दोन मित्रांनी एका युवकाची धारदार चाकूने हत्याची केल्याची धक्कादायक घटना एकलहरा रोड, मोहिते पार्क हॉटेलजवळ घडली आहे.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रणजित उर्फ रिंकू हरभजन ग्राय (वय ३५, रा.अरिंगळे मळा, नाशिक) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर उर्फ नान्या नारायण उमाप (वय २१, रा. नेहे मळा, ओढा रोड), शब्बीर मोहमद शेख (वय २५) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी दुपारी अरिंगळे मळा, एकलहरा रोडवर रणजित ग्राय हे मित्रांसमवेत दारु पीत होते. दारु पीत असताना तिघांमध्ये जुन्या वादातून भांडण सुरु झाले. रणजित याने शब्बीर शेखच्या कानाखाली वाजवली. राग अनावर झाल्याने संशयितांनी रणजित याच्यावर चाकूने वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी अवस्थेत रणजित खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन संशयितांना हत्यारांसह ताब्यात घेतले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मुंबईत फेसबुकवर लाईव्ह येऊन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bank Holiday In October : ऑक्टोबर मध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार, यादी पहा

मुंबईत रेल्वे अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक, नऊ लाखांचे नुकसान

राहुल गांधी यांच्या जीवाला धोका शिवसेना युबीटी नेते संजय राऊत म्हणाले

ठाण्यातील एका व्यावसायिक इमारतीच्या11 व्या मजल्यावर आग

पुढील लेख
Show comments