Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सासूने सुनेचे नाही तर सुनेने केली सासूची हत्या मुंबईतील प्रकार

murdered in Mumbai
, शुक्रवार, 21 जून 2019 (10:02 IST)
नेहमीच आपण वृत्तपत्रात वाचतो की सासू सुनेला त्रास देते, कधी कधी सुनेला सासूच्या त्रासाला कंटाळून स्वतःचा जीव देखील देतात. मात्र मुंबई येथील वडाळा परिसरात एका सुनेने तिच्या सासूची किरकोळ कारणावरून हत्या केली आहे. या प्रकरणात सासू साखराबाई गिरे असं या मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी वडाळा पोलिसांनी सुरेखा गिरे (३५) या सुनेला अटक केली आहे.
 
वडाळा येथील कोरबा मिठागर परिसरातील तांबे नगरमध्ये साखराबाई या त्यांचा मुलगा आणि सुनेसोबत राहतात. मागच्या काही दिवसांपासून दोघींमध्ये क्षुल्लक कारणांवरून जोरदार  वाद होत होते. अमाझी सून व्यवस्थित सांभाळ करत नसल्यामुळे नावावर असलेली खोली साखराबाई यांनी विकण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावरून त्या  दोघींमध्ये पुन्हा मोठा वाद झाला होता. या  वादात राग अनावर झालेल्या सुरेखाने साखराबाईला जोरदार मारहाण केली. गंभीर मारहाणीत साखराबाई गंभीर जखमी झाल्या आणि बेशुद्ध पडल्या. तेव्हा त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वडाळा पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गंगाधर सोनावणे यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लिंगायत समाजातील विचारवंत, उत्तम व्याख्याते प्रा. राजशेखर सोलापुरे यांना जबर मारहाण