Festival Posters

शिवसेना माजी नगरसेविकेच्या पतीवर खुनी हल्ला

Webdunia
मंगळवार, 26 जुलै 2022 (14:58 IST)
इस्लामपूर: शिंदे गटात प्रवेश करत नाही म्हणून शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार दिनकर शिंदे (वय ४९) यांच्यावर शिवसेनेचे तालुका प्रमुख सागर मलगुंडेसह सहा अनोळखींनी रॉडने खुनी हल्ला केला.’ ही घटना सोमवारी (ता.२६) सकाळी आठच्या सुमारास हनुमाननगर रस्त्यावर घडली. यामध्ये शिवकुमार शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सांगली येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
 
शिंदे हे सकाळी आठच्या सुमारास रेणुका दूध डेअरीमधून मोटारसायकलवरुन दूध घेऊन घरी जात होते. मंत्री कॉलनी येथे डॉ. शिंदे यांच्या घरासमोर लाईटच्या पोलचे काम सुरु असल्याने पोलला शिडी लावली होती. त्या शिडीजवळ तीन व्यक्ती उभ्या होत्या. एक व्यक्ती शिडीवर होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते. त्यातील एकाने शिंदे यांना वर काम सुरु आहे, जरा थांबा असे सांगितले. त्यावेळी शिंदे यांनी मोटारसायकल थांबवली. त्यापैकी एकाने शिंदे यांच्या उजव्या हातावर रॉडने जोरात मारल्याने शिंदे खाली पडले. मागून तिघांपैकी एकाने शिंदे यांच्या पाठीत रॉडने हल्ला केला. दरम्यान हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी शिंदे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अमेरिकेने आणखी एका बोटीला लक्ष्य केले,87 जणांचा मृत्यू

घटस्फोट देण्यास नकार दिल्याने पत्नीने भावाच्या आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने पतीची केली हत्या; चार जणांना अटक

IND vs SA ODI: शनिवारच्या निर्णायक सामन्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ विशाखापट्टणममध्ये दाखल

IIM इंदूर येथे प्लेसमेंटच्या नावाखाली मुलींशी गैरवर्तन

LIVE: नगरपंचायत निवडणुकीत १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान झाल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला

पुढील लेख
Show comments