मकर संक्रांतीचा सण जवळच आहे. या निमित्ते आकाशात पतंगे दिसतात. लोक आवडीने आणि उत्साहाने पतंगबाजी करतात. पतंग उडवताना किंवा लुटताना नेहमी अपघात होतात. तसेच पतंगाचा मांजामुळे देखील अपघात घडतात. अशीच एक घटना नागपुरातील समतानगर येथे घडली आहे. या ठिकाणी पतंग उडवताना विजेच्या ताराला स्पर्श होऊन अपघात होण्याची घडली आहे. या अपघातात मुलगा होरपळला असून त्याचा पाय कापावा लागला आहे.
समतानगर येथे राहणारा मुलगा बुधवारी गच्चीवर पतंग उडवत होता.त्यात तो इतका गुंग झाला की एकाएकी त्याचा हात वरील जाणाऱ्या विजेच्या ताराला स्पर्श झाला आणि त्याला विजेचा शॉक बसून तो गंभीररीत्या होरपळला.त्याच्या शरीराचा मानेपासून खालचा भाग पूर्णपणे भाजला होता. शरीरावरील जखमा इतक्या खोल होत्या की त्याच्या पायाची हाडे देखील दिसत होती. त्याला गंभीर अवस्थेत तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असून या मुलाचे दोन्ही हात आणि पाय निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तो 60 टक्के भाजला होता. गुरुवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करून त्याचा एक पाय कापावा लागला. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे.पतंग उडवताना काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.