महाराष्ट्रातील नागपूर येथील एका कारखान्यात स्फोटानंतर भीषण आग लागली. या अपघातात तीन मजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे, 3 तीन मजूर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्याचे आदेश दिले आहेत. हिंगणा, नागपूर एमआयडीसीतील निपाणी गावातील कटारिया अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत (Nagpur Company Fire)अचानक स्फोट झाला, त्यानंतर कंपनीत आग लागली. ही आग इतकी वेगाने पसरली की, कोणालाही कारखान्यातून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या आगीत 3 मजुरांचा मृत्यू झाला असून तीन मजूर जखमी झाले आहेत.
या घटनेबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले आहे. तहसीलदार घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमी मजुरांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता आग आटोक्यात आली आहे.
यासोबतच अधिकाऱ्यांना लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. बचाव पथक मदत आणि बचाव कार्य करत आहे ही टीम कारखान्यातील उरलेल्या लोकांना बाहेर काढण्यात गुंतलेली आहे. या टीमशिवाय स्थानिक रहिवासीही मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. लोकांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात येत आहे.