Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 19 May 2025
webdunia

सैफ प्रकरणावर बोलले नाना पटोले,फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर निशाना साधला

Nana Patole
, शनिवार, 18 जानेवारी 2025 (15:30 IST)
अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाला या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणी विरोधक राज्य सरकारवर निशाना साधत आहे. राज्यातील संपूर्ण जनतेच्या सुरक्षेचा प्र्श्न बनल्याचे म्हणत आहे. 
नाना पटोले यांनी देखील सरकारच्या व्यवस्थेवर हल्लाबोल केला आहे. तसेच नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर देखील हल्लाबोल केला आहे. 

सैफ अली खान प्रकरणात नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात गावाचे सरपंच देखील सुरक्षित नहीं. जनताच नाही तर सेलेब्रिटी देखील सुरक्षित नाही. पोलिस शासनाने दिलेल्या निर्देशानुसार काम करतात. सैफ ज्या ठिकाणी राहतात तो क्षेत्र सुरक्षित आहे. पोलिसांची गस्त देखील त्या ठिकाणी असते. अशा ठिकाणी देखील हल्ला झाला असून अद्याप आरोपी मोकाट आहे. हे राज्य सरकारचे अपयश आहे. 
महाराष्ट्रात गावाचे सरपंच, सामान्य जनता आणि सेलिब्रिटी सुरक्षित नाही. महाराष्ट्रात आता पोलिसांचा धाक संपला आहे. याची जबाबदारी भाजपची असून पोलिसांनी अद्याप हल्लेखोराला अद्याप अटक केली नाही. हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. 

मुख्यमंत्री यांच्या दावोस दौऱ्यावर ते म्हणाले, सध्या प्रत्येक मुख्यमंत्री दावोसला जात आहे. जो कोणी दावोसला जातात त्याने जाऊन जनतेच्या पेशावर मौजमजा केली आहे. महाराष्ट्रात आज सर्वत्र बेरोजगारी वाढली आहे. त्यासाठी राज्य सरकारने पाउले घेतली पाहिजे. आम्हाला आशा आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीस दावोसला जातील तेव्हा जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही आणि आमच्या राज्यात मोठी गुंतवणूक होईल.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: मुंबईत उद्या रेल्वेचा 4 तासांचा मेगाब्लॉक