Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राणेंच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब नाही

narayan rane
भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबई दौऱ्यात अमित शाह नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राणेंसंदर्भात  कोणताही निर्णय होणार नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं आहे.
 
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या घरातील गणपतीचं दर्शन घेऊन अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याला सुरूवात झाली. त्यानंतर अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. तसंच अमित शाहांच्या हस्ते ‘हमारे नरेंद्र भाई’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.
 
त्यानंतर अमित शाहंनी मुंबईतल्या सिद्धीविनायकाचंही दर्शन घेतलं. मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलाच्या दृष्टीने अमित शाहंचा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राम रहिम सिंग यांच्या शिक्षेवर आज फैसला