माझ्या जीविताला धोका आहे, माझं काही कमी जास्त झालं तर राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
माझ्या जीविताला धोका आहे, म्हणून मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. ती सरकारने काढली आहे. याबाबत माझी काही तक्रार नाही, परंतु जीवाचं काही बरंवाईट झालं तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल असं राणे यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारने भाजप आणि इतर पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. यावरून भाजप नेत्यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.
भंडारा इथल्या अपघातासंदर्भात राणेंनी टीका केली आहे. भंडाऱ्यात जिल्हा रुग्णाला लागलेल्या आगीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं ते म्हणाले.