Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक :विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला अपघात,तिघे थोडक्यात बचावले (फोटो)

Webdunia
बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (21:00 IST)
नाशिक :  राज्यातील अनेक संवेदनशिल खटल्यांमध्ये सरकार पक्षाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला आहे . श्रीरामपूर वरून कामकाज आटोपून समृदधी महामार्गाने मुंबईच्या दिशेने जात असताना भरवीर फाट्यावर सदरचा अपघात घडला.ॲड. मिसर यांच्या ताफ्यात बाहेर वाहन घुसल्याने अपघात घडला असून, यात ॲड मिसर यांच्यासह तिघे थोडक्यात बचावले आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, विशेष सरकारी वकील अजय मिसर हे न्यायालयीन कामकाजा निमित्ताने श्रीरामपूर येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर त्यांचा ताफा समृद्धी महामार्गाने मुंबईच्या दिशेने निघाला होता. ॲड. मिसर यांच्याकडे पीएफआयसह अनेक संवेदनशिल खटल्याचे कामकाज पहात असल्याने त्यांना विशेष सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे. पायलट वाहन आणि एस्कॉर्ट वाहनाच्यामध्ये ॲड. मिसर यांचे सफारी चारचाकी वाहन (एमएच 01 सीपी 1618) जात होेते.
 
समृद्धी महामार्गावरील भरवीर फाट्यानजिक त्यांच्या पायलट वाहन आणि ॲड. मिसर यांच्या वाहनाच्या मधे खासगी वाहन घुसल्याने सदरचा अपघात घडला. यावेळी ॲड. मिसर यांच्या वाहनाच्या चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.
 
या वाहनात ॲड. मिसर यांच्यासह चालक व त्यांचा सहकारी वकील होते. यात त्यांच्या वाहनाची (एमएच 01 सीपी 1618) समोरील बाजुचे मोठे नुकसान झाले आहे. तर, ॲड. मिसर यांच्या खांद्यासह चेहर्याला किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचार करून ॲड. मिसर दुसर्या वाहनाने नाशिकला परत येत असल्याची माहिती त्यांचे सहकारी ॲड. प्रथमेश शिंगणे यांनी दिली.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

इस्रायलचा पुन्हा गाझावर हल्ला, ८२ जणांचा मृत्यू

दिल्ली ते मुंबई-हावडा अंतर कमी होणार, दोन्ही मार्गांवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेने आवश्यक ती मान्यता दिली

LIVE: मुंबई गुन्हे शाखेने ४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले

मुंबईत ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पुणे: विहिरीत पडलेला बिबट्याच्या पिल्लूला वाचवल्यानंतर जंगलात सोडले

पुढील लेख
Show comments