Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कॅट’नंतर आता DRDO कार्यालयाची ड्रोनद्वारे रेकी? गुन्हा दाखल

कॅट’नंतर आता DRDO कार्यालयाची ड्रोनद्वारे रेकी? गुन्हा दाखल
, सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (09:12 IST)
नाशिक  – शहरालगत असलेल्या संरक्षण विभागाच्या प्रतंबिधित क्षेत्राची रेकी सुरू आहे की काय, असा प्रश्न निर्माण करणाऱ्या धक्कादायक बाबी घडत आहेत. लष्कराची हवाई प्रशिक्षण संस्था (कॅट) वर काही दिवसांपूर्वी ड्रोन उडाल्यानंतर आता नववा मैल येथील संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) येथेही असाच प्रकार घडला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल गुप्तचर यंत्रणांनी घेतली आहे.
 
नाशिक शहर परिसरात संरक्षण क्षेत्राच्या अनेक संस्था आहेत. गांधीनगर येथे लष्कराचे कॅट, त्यालगतच तोफखाना, तेथेच तोफखाना प्रशिक्षण केंद्र, हवाई दलाचे तळ, नोट प्रेस, करन्सी प्रेस, हवाई लढाऊंची निर्मिती करणारे एचएएल, भारतीय हवाई दलाचे देखभाल दुरुस्ती केंद्र आदींचा त्यात समावेश आहे. ही सर्व ठिकाणे अतिशय संवेदनशील आहेत. त्यामुळे तेथे सर्वसामान्यांना प्रवेश नसतो. तसेच, प्रतिबंधित क्षेत्र असल्याने तेथे विविध प्रकारचे नियम लागू होतात. या क्षेत्रांच्या परिसरात ड्रोनला परवानगी नाही. असे असतानाही महिन्याभरातच नाशिकमध्ये दोन धक्कादाय घटना घडल्या आहेत.
 
गांधीनगर येथील कॅट येथे ड्रोन फिरविण्यात आल्याची घटना गेल्या महिन्यात घडली. या ड्रोनचा शोध घेत असतानाच तो गायब झाला. बरीच शोधाशोध करण्यात आली पण कुठलाही थांगपत्ता लागला नाही, अखेर संरक्षण विभागाने उपनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणाचा तपासही शून्य आहे. एवढी मोठी आणि गंभीर घटना घडलेली असताना या प्रकरणी अद्याप आरोपी किंवा संबंधित ड्रोन मिळून आलेला नाही. त्यातच आता नाशिकमध्ये दुसरा प्रकार घडला आहे.
 
नाशिक-मुंबई आग्रा महामार्गालगत नववा मैल येथे डीआरडीओचे केंद्र आहे. येथे संरक्षण क्षेत्राशी निगडीत विविध संशोधन आणि कास कामे चालत असतात. हे सुद्धा प्रतिबंधित क्षेत्रच आहे. मात्र, या केंद्राच्या दुसऱ्या क्रमांकाच्या चौकी जवळ शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अज्ञात ड्रोन फिरताना दिसला. काही क्षणात हा ड्रोन तिथून निघून गेला. या प्रकारणी डीआरडीओच्या कर्मचाऱ्याने आडगाव पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे,  डीआरडीओ कार्यालयापासून काही अंतरावरच एचएएलचा कारखाना, हवाई दलाचे केंद्र, कार्गे हब आणि ओझर विमानतळ आहे. याची दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, एटीएस व एटीबीला तपासाच्या सूचना पोलिस आयुक्तालयाने दिल्या आहेत.
 
महिन्याभरात दोन गंभीर घटना घडूनही तपास यंत्रणांना त्याचा सुगावा लागलेला नाही. त्यामुळे याची गंभीर दखल संरक्षण विभागाच्या गुप्तचर यंत्रणांनी घेतली आहे. त्यामुळेच या दोन्ही

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

''वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो'',मनसेनंहीउद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला