Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चांदवड टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

nashik chandvad toll naka
, शुक्रवार, 15 डिसेंबर 2017 (17:23 IST)
२५ रायफल्स, १९ गावठी कट्टे आणि ४००० जिवंत काडतुसे सापडली
नाशिक जिल्ह्यातील चांदवड टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २५ रायफल्स, १९ गावठी कट्टे आणि ४००० जिवंत काडतुसे आढळली आहे. याप्रकरणी नागेश राजेंद्र बनसोडे (२३), सलमान अमानुल्ला खान (१९), आणि  बद्रीनुजमान अकबर बादशाह उर्फ सुमीत (२७) यांना अटक करण्यात आली. याबाबत अधिक चौकशी केली असता उत्तर प्रदेशातील कानपुर येथील एका शस्त्रात्र गोदामातील चोरीचे शस्त्रास्त्र असल्याची माहिती दिली आहे.
nashik chandvad toll naka
याप्रकरणात गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता मालेगाव तालुक्यातील वाके फाट्यावरील शाई सुमन पेट्रोल पंप येथे बोलेरो जीप क्रमांक एमएच ०१ एस. ए.७४६० ही गाडी डिझेल भरण्यासाठी आली होती. पंप कामगाराने जीप मध्ये २७०० रुपयाचे डिझेल भरले. मात्र जीप चालकाने पैसे न देताच पोबारा केला. सदर घडलेल्या प्रकार तालुका पोलिसांना कळवताच तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतिश गावित यांनी सदर गाडीची माहिती चांदवड पोलीसांना बिनतारी संदेशाद्वारे दिली. त्यानंतर चांदवड टोलनाक्यावर जीप अडविण्यात आली असता जीप मधील प्रवाशाने पिस्तुलाचा धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा सदरचा प्रयत्न हाणून पाडला. जीपमधील तिघांना गाडीसह थेट चांदवड पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांची व जीपची कसून तपासणी केली असता जीपच्या टपावर एक कप्पा बनविण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यात काही तरी असल्याची शंका बळावल्याने पोलिसांनी तपासणी केली असता त्यातुन १७ रिव्हॉल्व्हर, दोन विदेशी पिस्टल, २४ रायफल्स, १२  बोअरची चार हजार १३६ काडतुसे व ३२  बोअरची १० काडतुसे हस्तगत करण्यात आली.गाडीत मोठ्या प्रमाणात लपविण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे खाचे करण्यात आले होते. ज्यामध्ये एवढ्या प्रमाणात शस्त्रं लपविण्यात आली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या महागड्या घरात राहतील विराट- अनुष्का