Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

धक्कादायक! नाशिकमध्ये तुफान राडा; दांडके, चॉपर घेऊन हाणामारी आणि दगडफेक

धक्कादायक! नाशिकमध्ये तुफान राडा; दांडके, चॉपर घेऊन हाणामारी आणि दगडफेक
, गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (16:23 IST)
आगरटाकळीत परिसरातील जमिनीच्या व्यवहाराच्या कारणावरून दोन गटात वाद हाणामारी झाली. यावेळी दगडफेकही करण्यात आली. या प्रकणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जगतापवाडी येथील कलावती शंकर जगताप यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मुलगा रवी घराजवळ शतपावली करत होता. घराजवळच असलेल्या ताज बिल्डर यांच्या कार्यालयाजवळ आरडाओरडा झाल्याने रवि तेथे जाऊन काय झाले ते बघून त्याबाबत विचारणा केली. त्याचा राग आल्याने अकबर शेख, अल्फराज शेख, अय्याज शेख यांनी रविला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याची आई कलावती मुलगा रवी याला सोडविण्यास आली असता संशयितांनी तिलाही माराहाण केली.
 
तर रामदास स्वामीनगर हरकुंज सोसायटीत राहणारे अकबर इस्माईल शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २००८ मध्ये जगताप कुटुंबाकडून आगर टाकळी शिवारातील त्यांची मिळकत खरेदी केली होती. खोडदेनगर येथील ताज डेव्हलपर्स कार्यालयात मुलगा अल्फराज, अय्याज व त्यांचा मित्र अननस शेख, सुमित पवार हे कामानिमित्त बसले होते. यावेळी संशयित रवी उर्फ गौतम शंकर जगताप, सागर आनंद जगताप, आनंद जगताप, कलावती जगताप, राजेश जगताप, चंद्रामणी जगताप, सुशांत जगताप हे हातात रॉड, चॉपर, दांडुके, 
 
कोयता घेऊन कार्यालयात घुसले. त्यांनी मुलगा अल्फराज व अय्याज यांना मारहाण करून त्यांच्या हाताचे बोट फ्रॅक्चर करून चॉपरने वार करून जखमी केले. तसेच कार्यालयातील साहित्य व दुचाकी यांची मोडतोड करुन नुकसान केले. वरील मिळकतीच्या व्यवहारावरून पाच लाखांची मागणी केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यसभेत महिला खासदारांना धक्काबुक्की, शरद पवार संतापले