Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक: अवघ्या ४५ मिनिटात अडीच लाखांच्या दागिन्यांवर चोरांनी मारला डल्ला!

Nashik: In just 45 minutes
, शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (15:06 IST)
नाशिक शहरात भुरट्या चोऱ्या, वाहनचोरी, आणि चेन ओढणे यांचे सत्र काही थांबतांना दिसत नाहीये.घरमालक बाहेरगावी असतांना झालेल्या चोऱ्यांबाबत आपण अनेकदा ऐकलं असेल.पण नाशिकमध्ये अवघ्या ४५ मिनिटात चोरट्यांनी बंद घरातून चोरी केल्याची घटना घडली आहे.
 
यामुळे आता पोलिसांसमोरसुद्धा आव्हान उभं राहिलं आहे.पाथर्डी फाट्यानजीकच्या वासननगर भागात बुधवारी भरदिवसा बंद प्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी अवघ्या ४५ मिनिटांत अडीच लाखांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सासूवर अंत्यसंस्कार करून परतलेल्या विवाहितेसोबत घडला अनर्थ, घरी येताच तडफडून गेला जीव
नाशिककरांनो.. अतिशय महत्वाची बातमी: येत्या २ एप्रिलपासून लागू होणार वाहतुकीचा हा नियम !
शिवलेखा अपार्टमेंट येथील रहिवासी संजय रमेश जवरे (रा. वासननगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या पत्नी सुप्रिया जवरे या मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास फ्लॅटला कुलूप लावून शेजारी गेल्या होत्या. त्यानंतर त्या ४५ मिनिटांनी परतल्या असता त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. घरात बघितले असता कपाटातून रोख रकमेसह तब्बल अडीच लाखांचे दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरीच्या घटना लक्षात घेत इंदिरानगर पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिककर! पेट्रोल पंप बंद संदर्भात महत्वाची बातमी