Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नाशिक: किसान पोर्टलचा अजब कारभार, जिवंत शेतकऱ्याला दाखवलं मृत

pm-kisan-samman-nidhi
, शनिवार, 22 एप्रिल 2023 (09:37 IST)
नाशिक: पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. अशातच शासनाच्या नियमाप्रमाणे PM किसान योजनेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करुनही अनुदान मिळत नसल्यामुळं संबंधित विभागाकडे चौकशी केला असता एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील लखमापूर येथील एका शेतकऱ्याला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर मृत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याला मृत घोषीत करुन PM किसान योजनेचे मिळणारे अनुदान गोठवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. रमेश केदा बच्छाव असं शेतकऱ्याचे नाव असून ते लखमापूरचे माजी सरपंच आहेत.
 
दरम्यान शासनाच्या नियमाप्रमाणे PM किसान योजनेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करुनही अनुदान मिळत नसल्यामुळं संबंधित विभागाकडे चौकशी केला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानं रमेश बच्छाव यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
 
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करुन संबधिंतांवर कारवाई करावी अशी मागणीरमेश बच्छाव यांनी केली आहे. जिवंत शेतकरी PM किसानच्या पोर्टलवर मृत धाकवल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र दिनापासून ई-शिवनेरी धावणार