Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

“नाथाभाऊ अजूनही आमचे पालकच,” चंद्रकांत पाटलांचं एकनाथ खडसेंबद्दल मोठं विधान

“नाथाभाऊ अजूनही आमचे पालकच,” चंद्रकांत पाटलांचं एकनाथ खडसेंबद्दल मोठं विधान
, शुक्रवार, 4 जून 2021 (11:41 IST)
राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात रंगली आहे. यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीसंबंधी बोलताना नाथाभाऊ अजूनही आमचे पालकच असल्याचं म्हटलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींमधून भाजपचा संघर्ष संपणार आहे का? असं विचारण्यात आलं असता चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, “भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही.
 
भेटीगाठी वेगवेगळ्या कारणांनी सुरु आहेत. शरद पवार आजारी आहेत, अनेकजण भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी करत आहे. त्यांची इच्छाशक्ती एवढी दांडगी आहे की आजारी असतानाही कामकाज सुरु आहे. आजारी होते म्हणूनच देवेंद्र फडणवीस त्यांची विचारपूस करण्यासाठी गेले होते”. पुढे ते म्हणाले की, “यानंतर एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिल्याचा विषयही असाच आहे. या महाराष्ट्राने आपण एकमेकांचे शत्रू जरी असलो तरी त्या भागात असलो तर भेटायला जायचं ही संस्कृती आहे. नाथाभाऊ काय आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच आहेत. त्यांच्या घरात तर भाजपाच्या खासदार आहेत. प्रामुख्याने रक्षाताईंना भेटायला ते गेले होते. संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही. जर संवाद नसेल तर अडचण असते. पण इथे फडणवीस आहेत त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही”.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रात 5 टप्प्यांत अनलॉक होणार की नाही? गोंधळ का झालाय?