Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवाब मलिक : 'माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत

Nawab Malik: 'Government guests are coming to my houseनवाब मलिक : 'माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत Maharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi
, शनिवार, 11 डिसेंबर 2021 (19:23 IST)
ईडीने माझ्याकडे येण्याची तसदी घेण्याऐवजी मलाच कधी यायचंय हे सांगावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय.
आपल्या घरावर धाड पडण्याची शक्यता असल्याचं सांगणारं ट्वीटही नवाब मलिक यांनी काल (10 डिसेंबर) केलं होतं.
ईडीने किरीट सोमय्यांना आपले अधिकृत प्रवक्ते म्हणून नेमावं, असा टोलाही नवाब मलिकांनी लगावला आहे.
"एखादी कारवाई करण्यात येत असेल तर त्याविषयी अधिकृत प्रेस रिलीज ईडीने काढावं, फक्त 'व्हिस्परिंग कॅम्पेन्स' करत, मीडियामध्ये बातम्या पेरत महाराष्ट्रातल्या नेत्यांना, महाराष्ट्रातल्या सरकारला बदनाम करण्याचं काम बंद करावं," असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
तर किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलंय, "नवाब मलिक सध्या बोलत आहेत की, माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत. माझे नवाब मलिकांना एक सांगणे आहे की, जर आपण घोटाळा केला असेल, पुणे वक्फ बोर्डाचा घोटाळा, जमिन गोंधळात आपले नाव असेल, तर आपल्या घरी सरकारी पाहुणे नाही येणार. तर आपल्यालाच सरकारचे पाहुणे बनावे लागणार."
वक्फ बोर्डाच्या कार्यालयांवर छापा पडला नसून तशा बातम्या पसरवण्यात येत असल्याचं नवाब मलिक यांनी आज म्हटलं आहे.
आपल्या घरावर धाड पडण्याची शक्यता असल्याचं म्हणणारं सूचक ट्वीट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 10 डिसेंबरच्या रात्री केलं होतं.
या ट्वीटमध्ये नवाब मलिक यांनी म्हटलं होतं, "मित्रांनो, असं ऐकलंय की माझ्या घरी आज उद्यात सरकारी पाहुणे येणार आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करतो. घाबरणं म्हणजे रोजचं मरण, आम्ही घाबरणार नाही, लढणार आहोत. गांधीजी गोऱ्यांशी लढले होते, आम्ही चोरांशी लढणार आहोत."
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक बातमी ! शाळा बंद करायची म्हणून विद्यार्थ्याने 20 मुलांना दिले विष