suvichar

राज्यात 16 पासपोर्ट केंद्रं लवकरच सुरु होणार

Webdunia
शनिवार, 9 डिसेंबर 2017 (09:04 IST)
येत्या मार्च 2018 पर्यंत देशात 251 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात 16 पासपोर्ट केंद्रं लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी ही दिली आहे.

देशातील नागरिकांना पासपोर्ट सेवा सहज आणि सुलभपणे मिळावी या उद्देशाने ही नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. येत्या मार्च 2018 पर्यंत देशात 251 केंद्र सुरू होणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात 20 पासपोर्ट केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रातील 20 पासपोर्ट केंद्रांपैकी 4 पासपोर्ट केंद्र सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर व पिंपरी चिंचवड येथे सुरु करण्यात आली आहेत. उरलेली 16 पासपोर्ट केंद्र लवकरच सुरु होतील यामध्ये सिंधुदुर्ग, वर्धा, जालना, लातूर, अहमदनगर, पंढरपूर, सांगली, बीड, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, घाटकोपर, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड व जळगाव याठिकाणी नवीन केंद्र सुरु होतील. या 16 नवीन पासपोर्ट केंद्रामुळे राज्यात पासपोर्ट केंद्रांची संख्या 27 होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

७ धावांनी पिछाडीवर असूनही बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला चांगलेच झुंजवले

LIVE: राज्य सरकारने ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण अनिवार्य केले

वडिलांसाठी फादर्स डे निमित्त घरच्या घरी हॉटेलसारखा भव्य बेत; येथे पहा रेसिपीज

LIVE: भिवंडीतील एकाच दुकानातील दूषित शोरमा खाल्ल्याने ५९ जणांना विषबाधा!

मंत्री गिरीश महाजन यांचा एका मुलीसोबतचा व्हायरल फोटो राजकीय गदारोळाचे कारण ठरला, प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले

पुढील लेख
Show comments