Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नितेश राणेंचा जामिनासाठीचा अर्ज मोकळा, उद्या पुन्हा सुनावणी

Webdunia
शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (21:04 IST)
संतोष परब हल्ला प्रकरणात कणकवली न्यायालयाने नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांचा जामिनासाठीचा अर्ज मोकळा झाला आहे. त्यामुळे नितेश राणे यांचा जामिन अर्ज आम्ही न्यायालयात दाखल केला असल्याची माहिती राणेंचे वकील सतिश मानेशिंदे आणि संग्राम देसाई यांनी दिली होती. या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.
 
कणकवली न्यायालयाने नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावताच लगेचच सत्र न्यायालयात जामिनासाठीचा अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राणेंचे वकील सतिश मानेशिंदे आणि संग्राम देसाई यांनी दिली होती. या अर्जावर आता उद्या म्हणजे ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याचं अॅड. संग्राम देसाई यांनी म्हटलं आहे.
 
नितेश राणेंची तब्येत आधीपासूनच बरी नव्हती. पण ठरल्याप्रमाणे, न्यायालयाच्या आदेशामुळे ते पोलीस कोठडीत गेले होते. पण आता नियमित तपासणी होईल, त्यात डॉक्टरांना जे आढळून येईल, त्यानुसार पुढची कार्यवाही होईल. आम्ही फक्त न्यायालयात नमूद केलं आहे की त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांना उपचाराची गरज वाटली तर उपचार केले जातील. नाही वाटलं तर काही हरकत नाही. न्यायालयाला माहिती द्यायचं आमचं काम होतं, ते आम्ही केलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अनंतनागमध्ये चतुर्भुज स्पर्धा, पिरजादा मोहम्मद सईदची प्रतिष्ठा पणाला

प्रसिद्ध मिठाईच्या दुकानातील समोशामध्ये बेडकाचा पाय सापडला, दुकानदारावर कारवाई

39 वर्षीय महिलेने लग्नासाठी ठेवली अशी अट, ऐकून लोक थक्क झाले

महाराष्ट्रात पाळीव कुत्र्यावरुन शेजाऱ्यांमध्ये झालेला वाद पोहचला पोलीस स्टेशनमध्ये

कबुतरांना दाणे खाऊ घालणाऱ्या व्यक्तीला मारहाण, ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments