गो करोना, करोना गो, रामदास आठवलेंची ही आगळी-वेगळी घोषणा खूप गाजली होती. आता त्यांनी एक नवी घोषणा दिली आहे. ही घोषणा आहे ‘नो करोना, नो करोना!
करोनाच्या संकटाबाबत रामदास आठवले यांनी म्हटले की गो करोना, करोना गो ही माझी भावना होती जी बोलून दाखवली होती. आठवले यांनी 20 फेब्रुवारीला चीनच्या अँबेसेडेर यांच्यासोबत एक प्रतीकात्मक कार्यक्रम घेतला होता. सध्या आठवले घरातच राहून पुस्तक वाचत आहे, कविता लिहित आहे, तर कॅरम खेळून आणि गिटार वाजवून आपला वेळ काढत आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखताती त्यांनी म्हटले की गो करोना ही घोषणा अचानक सुचली आणि मला बर्याच गोष्टी माझं आडनाव आठवले असल्यामुळे लगेच आठवतात.
ते म्हणाले की आता मी म्हणतोय नो करोना, नो करोना. करोना गो ही माझी भावना होती. त्याने काही प्रभाव पडेल वा नाही परंतू ती प्रतीकात्मक घोषणा होती.