कोरोनाचा संसंर्ग पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणं बंधनकारक असेल, असं राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झालेली नाही. याबाबतच्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचंही अजित पवार म्हणाले.
काही देशांनी मास्कचा वापर करण्याचा नियम शिथिल केला असून मास्कपासून मुक्ती केलेली असली, तरी महाराष्ट्रात सद्यस्थितीत मास्क परिधान करणं गरजेचं असल्याचं पवारांनी सांगितलं.
करोना संपेपर्यंत महाराष्ट्रात नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करावाच लागेल, असंही पवारांनी यावेळी अगदी स्पष्ट केलं आहे.