राज्यात युकेवरून एकही फ्लाईट लँड होणार नाही. जे आता तेथून टेक ऑफ झालेत, त्यामधील प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल, एकही जण घरी सोडला जाणार नाही. एकूण पाच फ्लाईट येणार असून १ हजार जण असतील. लक्षणे असतील तर सेव्हन हिल्समध्ये ठेवले जाईल. लक्षणे नसलेल्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जाईल. अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली आहे.
'इतर युरोपीयन देशांतून येणा-या फ्लाईटमधील लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. लक्षणे असलेल्यांना जीटी रूग्णालयात दाखल केले जाईल. इतरांना हॉटेलमध्ये ठेवले जाईल. एकालाही मुंबई सोडता येणार नाही.' असं माहिती देखील चहल यांनी दिली आहे.
'बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना हाताळणा-यांना मोफत पीपीई कीट दिले जाणार आहे. इतर देशांतून येणा-यांना आरटीपीसीआर टेस्ट केली जाईल. लक्षणे नसलेल्यांना हातावर शिक्का मारून होम क्वारंटाईन केले जाईल. २ हजार जणांची हॉटेलमध्ये क्वारंटाईन करता व्यवस्था केली गेली.' असल्याची माहिती चहल यांनी दिली.
'२३ डिसेंबरपासून रात्री ११ ते ६ नाईट कर्फ्यू मुंबईत असेल. मागील विकेंडचा अनुभव पाहता हा निर्णय घेतला गेला आहे. हा काही लॉकडाऊन नाही. रात्री ५ पेक्षा जास्त लोकांना जमता येणार नाही. दूध,भाजीपाला वाहतूकीवर परिणाम होणार नाही. रात्री ११ पर्यंत सर्व काम आताप्रमाणे सुरू राहिल. नविन विषाणूबाबत अद्याप डॉक्टरांनी अधिक माहिती नाही, त्यामुळं विलगीकरण महत्वाचे असल्याचं,' आयुक्त चहल यांनी म्हटलं आहे.