Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिंदेना महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही, कर्नाटकमध्ये कोण ओळखणार, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Webdunia
सोमवार, 8 मे 2023 (21:41 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही. त्यांना कर्नाटकमध्ये कोण ओळखणार, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे. सातारा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
 
अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. काही मुद्दे कळीचे ठरत आहेत. बारसू प्रकल्पाचा मुद्दा चिघळत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री शिंदे कर्नाटकात प्रचाराला गेले आहेत. त्यांना कोण ओळखत कर्नाटकात?, महाराष्ट्रात त्यांना कोण ओळखत नाही. तेथे त्यांना कोण ओळखणार आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकार हे भ्रष्टाचारी आहे. बदल्यांसाठी त्यांचा रेट ठरला आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला.
 
सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. येथे मनगट तोडण्याचे काम सुरू आहे. अशी परिस्थिती येथे असेल तर सरकार काय झोपा काढतंय का?. कोरेगावमध्ये पोलीस निरीक्षक पदी यायला कोणी अधिकारी तयार होत नाही, असे चित्र आहे. मी साताऱ्याचा पालकमंत्री होतो. तेव्हा असे घडत नव्हते. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे, असा दावा अजित पवार यांनी केला.
 
माझ्या बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाहीत. प्रकल्पही परराज्यात गेले, यांनी ते प्रकल्प थांबवण्यासाठी काहीही केलेलं नाही. नवीन प्रकल्प आणण्याची धमक यांच्यातही नाही. ७५ हजार मुला-मुलांना नोकऱ्या लावणार असं राज्य सरकारनं सांगितलं होतं?, त्याचं काय झालं. काहीही नाही. त्या मंत्रालयात बसायला कुणीही तयार नाही. अवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला असून त्यांना मदत पुरवली जात नाही. आमचं सरकार असतं तर ७ कोटीपर्यंत आमदार निधी गेला असता, असं पवार म्हणाले.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

जम्मू-काश्मीर : किश्तवाडमध्ये चकमकीत एक जवान शहीद

आशियाई महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात, जपान-कोरिया यांच्यात पहिला सामना

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपवर आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments