Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

raj thackeray
, मंगळवार, 19 एप्रिल 2022 (15:06 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजी दिलेल्या भोंग्याविषयीच्या अल्टिमेटने राजकारण चांगलेच तापले आहे. गुढीपाडव्याल्या झालेल्या सभेनंतर लगेच राज ठाकरेंनी पुण्यात पत्रकार परिषद  घेतली आणि 3 मे नंतर हिंदूनी तयार राहण्याचेही आवाहन केलं यासोबतच 5जूनला अयोध्या (Ayodhya ) दौरा करणार असल्याचे देखिल राज ठाकरे यांनी सांगितले.
 
आता हनुमान जयंतीनंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते 3 मे म्हणजेच अक्षय तृतीयेला  कारण राज्यात अक्षय्य तृतियेला महाआरती करा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांनी दिले आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थ या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी हे आदेश दिले आहेत. याची माहिती मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी दिली.
 
बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, “राज ठाकरेंनी नेते मंडळी, सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि, विभाग अध्यक्ष मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या विभागातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत १ मे ला औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेची काय तयारी करायची याची माहिती दिली असून त्याबाबत सूचना दिल्या. ५ जूनला अयोध्येला जाण्याचे नियोजनाच्या काही सूचना दिल्या. यासोबतच त्यांनी सांगितले की, राज ठाकरे यांच्या सुरक्षेसंदर्भात मी गृहमंत्र्यांना आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. ते पत्र त्यांना पोहोचेल. या पत्रासंदर्भातील कल्पना राज ठाकरेंना दिली आहे. सरकार काय करतं ते बघू.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Petrol Diesel Price: आज तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल आणि डिझेलचे दर, जाणून घ्या किती आहेत दर