Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुप्रिया सुळे व चंद्रकांत पाटील यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक

Once again a verbal clash
, शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (17:27 IST)
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक झडली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी चिमटा काढला आहे.
 
“शेतकऱ्यांना न्याय आणि महिलांचं शिक्षण यासाठी महात्मा फुले यांनी आयुष्यभर काम केले आहे. मात्र आजही ते काम पूर्ण झालेलं नाही. गेल्या वर्षभरात सरकारने यात काहीच काम केलं नाही. ते काम व्हावं हीच त्यांना आदरांजली ठरेल. तसेच महात्मा फुलेंना भारतरत्न मिळावा ही आमची सुरूवातीपासूनची मागणी आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
संजय राऊत यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर पाटील म्हणाले,”संजय राऊत यांच्या प्रतिभेपुढे माझ्यासारखा सामान्य माणूस काय बोलणार?,” असा टोला त्यांनी लगावला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्य सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानाचा संदर्भ देत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले,”त्या स्वप्नात आहेत का?,” अशी टीका पाटील यांनी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपचे रावसाहेब दानवे काही शुद्ध तुपातले आहे का : बच्चू कडू