Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

काँग्रेसकडून पुन्हा एकदा स्वबळाची भाषा,काँग्रेसला नवसंजीवनीची गरज असल्याचा शिवसेनेचा टोला

काँग्रेसकडून  पुन्हा एकदा स्वबळाची भाषा,काँग्रेसला नवसंजीवनीची गरज असल्याचा शिवसेनेचा टोला
, बुधवार, 14 जुलै 2021 (15:46 IST)
काँग्रेसने पुन्हा एकदा स्वबळाची भाषा केली आहे.  2024मध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष बनविण्यात येईल,असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.पटोले यांच्याकडून पुन्हा स्वबळाची भाषा झाल्याने आधीच्या वादात आणखी भर पडली आहे. त्याचवेळी स्वबळावर लढायचं असेल तर स्पष्ट सांगा,असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सवाल विचारला आहे.तर काँग्रेसला नवसंजीवनीची गरज असल्याचा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
 
स्वबळावर लढायचे हा काँग्रेस पक्षाचा अजेंडा असल्याचे नाना पटोले यांनी पुन्हा एकदा म्हटले. '2014 मध्ये काय झाले हे पवार साहेबांना माहीत असून आमच्या पक्षाने काय निर्णय घ्यायचा हे आमचा पक्ष बघेल,असेही पटोले म्हणालेत.इतकंच नाही तर 2024 मध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष असेल अशी प्रतिक्रियाही नाना पटोले यांनी उद्भवलेल्या वादानंतर दिली आहे.
 
त्याचवेळी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी,अशी राष्ट्रवादीने भूमिका मांडली आहे.एकटं लढायचं ठरवले असल्यास स्पष्ट सांगा,असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना थेट सवाल केला आहे.काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती होती.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी पवारांची भेट घेत भूमिका स्पष्ट करत पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोविड सेंटरमध्ये रूग्णाने केली डॉक्टरला मारहाण