Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लवकरच आणखी एक हजार शिवशाही बस येणार

one thousand
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच आणखी एक हजार शिवशाही बस येणार आहेत. त्यातील सुमारे ६०० बस एसटीकडून विकत घेतल्या जाणार आहेत.एसटीच्या ताफ्यात सध्या सुमारे एक हजार वातानुकूलित शिवशाही बस आहेत. त्यापैकी ५०० बस एसटीच्या मालकीच्या आहेत. तर उर्वरीत बस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही बस शयनयान सुविधा असलेल्या आहेत.
 
शिवशाही व्यतिरिक्त वातानुकूलित शिवनेरी, हिरकणी निमआराम, यशवंती मिडी, शितल निमआराम, वातानुकूलित अश्वमेध आणि साधी अशा विविध प्रकारच्या बस आहेत. 
प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता एसटी प्रशासनाने आणखी शिवशाही घेण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार एसटीकडून खरेदी केल्या जाणाऱ्या सुमारे ६०० बसची निविदा प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. या बस एप्रिल अखेरपर्यंत ताफ्यात दाखल होतील. तर भाडेतत्वावरील ४०० बसची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माघी एकादशी : विट्ठल रखुमाईचा गाभारा आकर्षक फुलांनी सजला