शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली त्यामध्ये तीन दिवसात घडलेल्या घटनेवर चर्चा झाली. यामध्ये आम्ही शिवसेनेसोबत राहणार आहे. शिवसेनेत जी परिस्थिती निर्माण झाली आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाम उभे असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील पत्रकारांसमोर दिला. याचबरोबर सरकार पडल्यास विरोधी बाकावर बसण्यासाठी तयारी करावी लागत नाही सरकार पडल्यास विरोधी बाकावर नक्कीच जावे लागेल असेही जयंत पाटील म्हणाले. त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं.
शिवसेना मविआतून बाहेर पडण्याबाबत आमच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. काल शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्यावर त्यांच्यात यावर चर्चा झाली नाही. आज शिवसेनेने जे विधान केलं आहे, गुहावटीमध्ये जे आमदार आहेत त्यांनी मुंबईत येऊन बोलावं. त्यांच बोलणं ऐकूण घेऊन काय तो निर्णय घेऊ असे सूतोवाच सेनेनं केलं आहे. त्यामुळे ते आमदार मुंबईत परत आल्यावर काय होतंय ते पाहू, असे जयंत पाटील म्हणाले.