Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

तर थेट पालकांना शिक्षा व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश

two wheelers
, शुक्रवार, 31 मार्च 2023 (22:18 IST)
अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यांवर वाहने चालविल्यामुळे होणार्‍या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी 18 वर्षाखालील मुलांना विनापरवाना वाहन चालविण्यास पालकांनी परवानगी देवू नये अन्यथा, पालकांना शिक्षा व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिला आहे.
 
मोटार वाहन कायद्यांतर्गत 16 वर्षाखालील मुलांनी वाहन चालविण्याचा गुन्हा केला तर गुन्ह्यामध्ये दोषी आढळणार्‍या मुलांच्या पालकांना तीन वर्ष कारावास व 25 हजार रूपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहन चालविण्याचा परवाना नसतांना वाहन चालविल्यास चालकास रूपये 5 हजाार व वाहन मालकास 5 हजार असा एकूण 10 हजार रूपये दंड व शिक्षेची तरतुद मोटर वाहन कायद्यात करण्यात आली आहे.
 
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वायुवेग पथकामार्फत जिल्हा व शहरात जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात 18 वर्षाखालील मुलांना वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे त्यांना वाहन चालविण्याची परवानगी देण्यात येवू नये, असे प्रबोधन प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक येथील अधिकारी वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयात जाऊन करीत आहेत. पालकांनी याची गांर्भीयाने दखल घ्यावी, असे आवाहनही प्रदिप शिंदे यांनी केले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

April Fool's Day : त्या आठ बातम्या ज्या लोकांना खोट्याच वाटल्या