Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नासाठी टाकीवर चढून ड्रामा

Webdunia
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (16:19 IST)
लग्नाला घरच्यांकडून होकार मिळावा म्हणून प्रेमीयुगलने ‘शोले स्टाइल’ड्रामा करत 10 तास पाण्याच्या उंच टाकीवर घालवले. नंतर कुटुंब, पोलिस त्यांची समजूत काढत होते, यानंतर हे प्रेमीयुगल खाली उतरले. हा गोंधळ रविवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होता. 
 
बीड शहरातील तरुण हा कामानिमित्त हिंगोलीत काही काळ वास्तव्यास होता. तिथे त्याची एका महिलेसोबत ओळख झाली, नंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान याची माहिती कुटुंबियांना झाली असता महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत, हे त्यांना कळाले. पण ती पतीपासून दूर राहते. यामुळे मुलाच्या कुटुंबीयांनी मुलाला परत बीडला आणले होते. त्यनंतर सदरील तरुण पळून गेला होता. महिनाभरानंतर त्याला शोधून बीड येथे आणण्यात आले. दरम्यान रविवारी तरुण व महिला बीडमध्ये  अंबिका चौक परिसरात असलेल्या अमृत अटल योजनेच्या टाकीवर चढले. मुलाने घरी फोन करून आपण टाकीवर चढलो असून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी पाण्याच्या टाकीकडे धाव घेतली. आताच आमचे लग्न करून द्या म्हणत दोघांनी टाकीच्या शेवटच्या टोकावर जाऊन बसून गेले. दरम्यान ‍पोलिसांनी याची माहिती झाल्यावर ते घटनास्थळी पोहचले. नगरसेवकही आले, बघता बघता बघणार्यांाची मोठी गर्दी झाली.सर्वांनी या प्रेमीयुगलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रात्री उशीरापर्यंत हा गोंधळ सुरू होता. लग्न लावून देण्याची तयारी दर्शवली, यानंतर रात्री उशीरा हे प्रेमीयुगल खाली उतरले असल्याचे सांगितले जाते.   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

LIVE: प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संपावर

प्राणघातक कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्यासाठी ट्विट केले

कारमध्ये बंद झाल्याने चार मुलांचा गुदमरून मृत्यू

पुण्यात भारतीय हवाई दलाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुढील लेख
Show comments