Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विठ्ठल- रूक्मिणी मंदिराचे प्राचीन स्वरूप होतेय नष्ट

Webdunia
पंढरपूर- भारतीय पुरातत्व विभागाकडून देशातील सर्व मंदिरे प्राचीन पद्धतीची राहवीत, यासाठी प्रयत्न हो आहेत. मात्र, विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या हेमाडपंथी मंदिराला चक्क आधुनिक पद्धतीची रंगरंगोटी करून मंदिराचे प्राचीन स्वरूप नष्ट करण्याचा प्रकार मंदिर समितीकडून होत आहे.
 
विठ्ठल- रूक्मिणीमातेचे मूळ मंदिर 5 हजार वर्षांपूर्वीचे आहे. विठ्ठलाचा चौखांबी परिसर 700 वर्षांपूर्वीचा, गरूड खांब परिसर 300 वर्षांपूर्वीचा व विठठ्लाचा सभामंडप यादवकालीन 150 वर्षांपूर्वीचा आहे. हा प्राचीन ठेवा जसाच्या तसा राहवा यासाठी शासनाकडूनदेखील प्रयत्न होत आहेत. तसेच विठ्ठलमूर्तीची झीज होऊ नये, यासाठी पुरातत्व विभागाकडून अनेक वेळा मंदिर समितीने मूर्तींची तपासणी करून घेतली आहे.
 
मंदिराला अनेक ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिराचे प्राचीन स्वरूप नष्ट होत होते. ते होऊ नये म्हणून पुन्हा औरंगाबाद येथील पुरातत्व खात्याकडून मंदिर समितीने मंदिराची स्वच्छता करून घेतली. मात्र, आषाढी वारी सोहळ्यासाठी मंदिर परिसरातील इतर ठिकाणांची रंगरंगोटी करताना मंदिर समितीने विठ्ठलाचे गर्भगृह व चौखांबी यांच्यामधील हेमाडपंथी मंदिराच्या भागाला रंगरंगोटी केली आहे. यामुळे मंदिर समितीकडून मंदिराची देखभाल व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

गुडघ्याच्या दुखापतीमुळे यानिक सिनर स्पर्धेतून बाहेर

श्रीलंका कसोटी मालिकेसाठी सर्फराज खानची टीम इंडियात एन्ट्री

साईराज बहुतुले यांनी शुभमन गिलच्या दुखापतीबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती दिली

UPI ​​व्यवहार शुल्काबाबत अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण: सर्वसामान्यांसाठी P2P व्यवहार पूर्णपणे मोफतच राहणार!

झारखंडमध्ये भरती परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात आंदोलन पेटले

पुढील लेख
Show comments