Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही : पंकजा मुंडे

pankaja munde
, बुधवार, 23 जानेवारी 2019 (16:30 IST)
भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या EVM हॅकिंगबाबत शुजाने केलेल्या दाव्याला दोन दिवस उलटल्यानंतर मुंडेंची ज्येष्ठ कन्या आणि राज्य सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मौन सोडले आहे. "मी हॅकर नाही, गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहे. मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 
 
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी सय्यद शुजा याने केलेल्या खळबळजनक दाव्यांबाबत प्रथमच मौन सोडले. ''मी हॅकर नाही, गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहे. मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाल्यानंतर मी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दरम्यान ही मागणी पूर्ण झाली आहे, तसेच त्यातून माझे समाधानही झाले आहे. आता याबाबत अधिक चौकशी करायची असेल तर देशातील मोठे नेते निर्णय घेतील.''असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तसेच EVM हॅक होऊ शकत नाही हे निवडणूक आयोगाने वारंवार स्पष्ट केले आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाळासाहेब यांच्या स्मारकासाठी वास्तूची कागदपत्रे सुपूर्द