Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंकजा मुंडे यांची अजित पवारांवर जोरदार टीका

Webdunia
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019 (15:58 IST)
धरणात लघुशंका करायची भाषा करणारे मराठवाडा दुष्काळमुक्त करणार का, असा सवाल विचारत महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शरसंधान साधलं. परळीमधील वैजनाथ मंदिराच्या विकास कामाच्या उद्घाटनावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
 
‘कोटींची योजना मी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. आपण सगळ्यांनी बातम्या पाहिल्या आहेत. मी सांगते पाच वर्षात हा दुष्काळमुक्त होणार आहे मराठवाडा. आणि हे कोण करणार आहे? ज्यांनी धरणामध्ये लघुशंका करण्याची भाषा केली त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारी लोकं करणार आहेत? परळीच्या गटारी साफ करायला जमत नाहीत, हे धरणं साफ करणार आहेत’ अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.
 
या लोकांची लायकी नाही. लायकी नसणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभे राहणाऱ्यांची लायकी कमी होते. परळीचे लोक हुशार आहेत. लोकल निवडणुकीत लोकल नेत्याला पकडतात आणि मोठ्या निवडणुकीत मोठ्या नेत्यांना साथ देतात. प्रीतमला नॅशनल लेव्हलला, मला स्टेट लेव्हलला आणि यांना नगरपालिकेत निवडून दिलं, असं म्हणत पंकजा मुंडेंनी बंधू धनंजय मुंडेंवर  चौफेर टीका केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

कानपूरमध्ये ट्रेन रुळावरून उतरवण्याचा आणखी एक प्रयत्न,लोको पायलट आणि असिस्टंटच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने गुन्ह्याची कबुली दिली

अंधेरीच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बोट उलटली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना दिली खास भेटवस्तू

महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या, आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments