Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परमबीर सिंग यांची नाशिक जिल्ह्यात कोट्यवधींची प्रॉपर्टी; असे झाले उघड

Parambir Singh's property worth crores in Nashik district; That's what happened Maharashtra News Regional Marathi News Webdunia Marathi
, मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (08:26 IST)
आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे सध्या फरार असले तरी त्यांच्याबाबतीत एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. सिंग यांची नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असला तरी कोंबडे काही आरवल्याशिवाय राहत नाही, असे नेत्यांकडून स्पष्ट केले जात आहे.
 
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  परमबीर सिंग यांचा साथीदार आहे. संजय मिश्रीलाल पुनुमिया. हाच  पुनुमिया हा परमबीर सिंग यांच्याच एका खंडणीच्या गुन्ह्यात सहआरोपी आहे. याच गुन्ह्यात तो सध्या तुरुंगात आहे. या पुनुमियाच्या माध्यमातून सिंग यांनी नाशिक शहरासह सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे, शेतकरी असल्याचे बनावट पुरावे जोडल्याचेही उघडकीस येत आहे. यासंदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
 
पुनुमिया हा एका आमदाराचा नातेवाईक आहे. त्यांच्या मदतीने आणि नाशिक जिल्ह्यातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा सर्व प्रकार दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. पूर्वी भाजपमध्ये असलेला हा आमदार असून तो आमदार असतानाच जागांचे व्यवहार झाल्याचे कळते.
 
पुनुमिया हा मूळ ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने सिन्नर तालुक्यातील मौजे धारणगाव, मिरगाव, पाथरे येथे कोट्यवधी रुपयांची जमीन काही वर्षांपूर्वी खरेदी केली आहे. या खरेदीसाठी पुनुमियाने शेतकरी असल्याचे काही पुरावे दिले आहेत. त्यात दोन सातबारे आहेत. या पुराव्यांद्वारेच सिन्नरच्याच दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनींची खरेदी झाली आहे. कोट्यवधी रुपयांची ही मालमत्ता पुनुमिया आणि त्याचा मुलगा सनी यांच्या नावे आहे. पुनुमियाच्या नावे परमबीर सिंग यांनीच ही मालमत्ता खरेदी केल्याचे बोलले जात आहे.
 
काही दिवसांपूर्वी सिन्नर पोलिस व तहसीलदार कार्यालयात मुंबईच्या अग्रवाल नावाच्या व्यक्तीने एक तक्रार केली. त्यात म्हटले आहे की, संजय पुनुमिया हा बनावट शेतकरी आहे. त्याने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमिनी खरेदी केली आहे. या तक्रारीची शहानिशा केली असता स्पष्ट झाले की, उत्तन (ठाणे) येथील जमीन बाबुलाल जे अग्रवाल व त्यांच्या बंधूंच्या नावे आहे. मात्र, त्यांच्या नावाचे सातबारा उतारे पुनुमियाने खरेदीवेळी जोडली. तर दुसऱ्या जमीन खरेदीत जोडण्यात आलेल्या सातबारा उताऱ्याचा मूळ मालकही पुनुमिया नसल्याचे दिसून आले. तसे, ठाणे तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
 
पुनुमियाचे सिंग यांच्याशी असलेले संबंध तसेच मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्याशी असलेले नाते यामुळे हा सर्व प्रकार हायप्रोफाईल असल्याचे बोलले जात आहे. जैन पूर्वी भाजपमध्ये होत्या. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली. त्यात त्या विजयी झाल्या. त्या भाजपमध्ये असतानाच नाशिकच्या जमिनींचा व्यवहार झाल्याचे सांगितले जाते. तर, नाशकातील एका लोकप्रतिनिधीही या कामी मोठी मदत केल्याचे सांगितले जात आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अहमदनगर जिल्ह्यातील या साखर कारखान्याने दिला सर्वाधिक ऊसदर !