काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका वक्तव्यावरून देशभरात राजकारण तापलं होतं. मात्र, आपण पंतप्रधानाबाबत नव्हे तर एका गावगुंडाबाबत बोललो अल्याचा दावा नाना पटोलेंनी केला होता.
त्यानंतर खरंच मोदी नावाचा असा गावगुंड आहे का याचा तपास सुरू झाला. त्यात मोदी नावाचा गावगुंड पोलिसांना सापडला असून त्याची चौकशी करून पोलिसांनी अहवाल पाठवला आहे.
नागपूरमध्ये उमेश घरडे नावाच्या व्यक्तीला एका वकिलानं माध्यमांसमोर उपस्थित केलं. पटोलेंनी उल्लेख केलेला मोदी हाच आहे असा दावा करण्यात आला. पटोले माझ्याबाबतच बोलले असं तो माध्यमांसमोर म्हणाला.
भंडारा जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी बोलताना पटोले यांनी, 'मी मोदीला मारू शकतो, शिवी देऊ शकतो,' असं वक्तव्य केल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.