Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

लोकांना फसवण ही पवारांची परंपरा: चंद्रकांत पाटील

chandrakant patil
मुंबई , बुधवार, 25 मे 2022 (21:07 IST)
ओबीसी समाजाच्य़ा मनात महाविकास आघाडी विरोधात राग आहे तो व्यक्त करण्यासाठी हा समाज भाजप कार्यालयासमोर आला आहे. त्यांचा भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंन्द फडणवीस  यांच्यावर विश्वास आहे. ओबीसी आरक्षणला मार्ग भाजप काढेल किंवा संर्घषाचे नेतृत्व करू शकते हा त्यांच्या मनात विश्वास आहे. मुंबईत आज योगेश टिळेकरांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणासाठी  मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी महाविकास आघा़डीवर निशाणा साधला.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, दोन वर्षापूर्वी ट्रिपल टेस्ट करा असे कोर्टाने सांगितले होते. मात्र महाविकास आघाडीच्या हे लक्षात आले नाही. राज्य सरकारनं ओबीसींना फसवलं याचा राग ओबीसींच्या मनात आहे. त्य़ांचा भाजपावर विश्वास आहे. मध्यप्रदेशमध्ये आरक्षण मिळतं, मग महाराष्ट्रात का नाही असा सवालही त्यांनी केला.
 
शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, पवार साहेबांकडे लोकांना गुळ दाखवाणे, फसवणे याची मोठी परंपरा आहे. मात्र ओबासी समाज त्यांच्य़ा गुळ दाखवण्याला भीक घालणार नाही. महाविकास आघाडीला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही हे त्यांच्या लक्षात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवाब मलिकांचे दाऊदशी कसे होते संबंध? दाऊदच्या भाच्याने हे सांगितलं….