मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांची परवानगी मिळली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही अटी आणि शर्तींसह राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मनसेनं मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभेची तयारी केली असून पोलिसांनीही सभेसाठी आराखडा तयार केला आहे. काही अटींसह त्यांना सभेसाठी परवानगी दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करू नये अशी अट घालण्यात येणार असून त्यांना तशी नोटीस दिली जाणार आहे.
राज ठाकरे यांच्या सभेला अटींसह परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सभा ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या दिवशीच होणार, असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.
राज ठाकरेंच्या सभेसाठी या अटी असतील-
ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे तसेच लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितेची दक्षता घ्यावी. इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत म्हणजेच प्रक्षोभक भाषण करू नये, याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र दिनानिमित्त धर्म, प्रांत, वंश, जात यावरून वक्तव्य करू नये तसेच एखाद्या व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी.
या व्यतिरिक्त सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करु नये तर वाहन पार्किंगचे नियम पाळणे, कुठल्याही प्राण्याचा वापर न करणे व इतर अटी समोर ठेवण्यात येणा आहे.