Festival Posters

शाळा झाली आनंददायी, पीएम श्री योजनेची अंमलबजावणी होणार

Webdunia
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (21:56 IST)
राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पीएम श्री योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाने केंद्रासमवेत सामंजस्य करार केला आहे.  या करारानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० राज्यात लागू करण्यात येईल.  पीएम श्री योजनेत केंद्राचा ६० टक्के हिस्सा असेल.  प्रत्येक शाळेसाठी १ कोटी ८८ लाख एवढी तरतूद ५ वर्षांसाठी करण्यात येईल.  या शाळांसाठी ५ वर्षांकरिता केंद्राचा हिस्सा ९५५ कोटी ९८ लाख राहणार असून राज्याचा ४० टक्के हिस्सा प्रती शाळा ७५ लाख प्रमाणे ६३४ कोटी ५० लाख खर्च अपेक्षित आहे. या योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ४०८ गट, २८ महानगरपालिका आणि ३८३ नगरपालिका व नगरपरिषदा यामधून पीएम श्री शाळांची निवड केली जाईल.  
 
या शाळांमधून अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांची वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील त्याचा ज्ञानाचा वापर आणि योग्यतेवर आधारित मुल्यांकन करण्यात येईल. या शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेऊन विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व शैक्षणिक मदत करण्यात येईल. काही कारणांमुळे विद्यार्थ्यांची शाळेतून गळती झाल्यास त्यांना पुन्हा प्रवेश देऊन अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात येईल.
 
या शाळांचा विकास प्रामुख्याने पुढील ६ प्रमुख आधार स्तंभांवर केला जाईल. अभ्यासक्रम, आध्यापन शास्त्र व मुल्यमापन; प्रवेश आणि पायाभूत सुविधा; मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व; समावेशक पद्धती आणि लैंगिक समाधान; व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन; लाभार्थी समाधान.
 
या योजनेची अंमलबजावणी राज्य स्तरावरून शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती, जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती आणि महापालिका स्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समित्यांमार्फत केली जाईल. राज्य प्रकल्प संचालक हे राज्य अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष असतील.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

व्हिएतनाममध्ये आपत्ती, पूर आणि भूस्खलनात41 जणांचा मृत्यू

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर कंटेनर डिव्हायडरला धडकला; भीषण आगीत चालकाचा जळून मृत्यू

LIVE: समाजवादी पक्षाने बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली

"आमदार आणि खासदारांशी सौजन्याने वागा..." सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना सरकारचे निर्देश

पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना; G20 शिखर परिषदेत भारताचे नेतृत्व करतील

पुढील लेख
Show comments