Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलिसांकडून महिलेकडे देह व्यापार सुरु ठेवण्यासाठी 35 हजारांची मागणी

Police demand
, बुधवार, 4 सप्टेंबर 2019 (15:39 IST)
नागपूरमधील दोन पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेकडून चक्क  तीन वेश्या  व 35 हजार रुपयांची मागणी केली आहे.  सदरच्या धक्कादायक घटनेमुळे नागपूर शहरात पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या दोन्ही पोलिसांना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. या प्रकरणी  पोलीस उपनिरीक्षक दामोदर राजुरकर आणि पोलीस हवालदार शीतलाप्रसाद मिश्रा या दोघांना ताब्यात घेतले आहे.  दोघंही समाजिक सुरक्षा पथकात कार्यरत होते. नागपूरमधील एका ठिकाणी एक महिला देह व्यापार चालवत होती, अशी माहिती पोलिसांनी मिळाली होती. यावर पोलिसांनी कारवाई करण्याचे सोडून त्यांनी थेट त्या महिलेकडे देह व्यापार सुरु ठेवण्यासाठी 35 हजार रुपये मागितले. विशेष म्हणजे या दोन पोलिसांनी शरीरसुखासाठी तीन वेश्यांचीही मागणी देह व्यापार चालवणाऱ्या महिलेकडे केली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Facebook वर नाही दिसणार Likes ची संख्या, Tag करण्यासाठी सुचवणार नाही