Marathi Biodata Maker

तीस लाख रुपयांचे कफ सिरप सर्दीला नाही तर यासाठी विकत होते पोलिसांनी केले अटक

Webdunia
सोमवार, 1 एप्रिल 2019 (09:55 IST)
कफ सिरप म्हटले की ते सर्दी पडसे ताप आदी साठी असते, तर त्याची किंमत सुद्धा माफक असते. मात्र हे कफ सिरप उपचार न ठरता नशा ठरले तर, असाच प्रकार मुंबईत उघड झाला आहे. नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं तब्बल 30 लाख रुपयांचं कफ सिरप पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केले असून, मरिन लाईन्स येथील बडा कब्रिस्तान परिसरातून कफ सिरपच्या बाटल्यांनी भरलेला टेम्पो पकडला आहे. टेम्पोमध्ये तब्बल  30 लाख रुपये किंमतीचे  नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं औषध होते. पोलिसांनी या गंभीर प्रकरणी चौघांना अटक केली आहे.
 
अंमली पदार्थ विरोधी पथकाला गुजरात येथून, ‘कोडेन फॉस्फेट’ सिरपचा साठा मुंबई शहरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. सिरप मुख्यत नशेबाज नशा करण्यासाठी वापरत होते. या माहितीच्या आधारे पथकाच्या अधिकाऱ्यांनी तपास करण्यास सुरुवात केली. दबंग पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे युनिटने मरिन लाइन्स येथील बडा कब्रिस्थान येथून कफ सिरपने भरलेला एक टेम्पो ताब्यात घेतला. या प्रकरणी वीरेंद्र सिंग, अझहर जमाल सय्यद, यशपाल गोपाल सिंग, सर्वर मोहम्मद शेख या चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हा टेम्पो तसेच टेम्पोमध्ये लपवण्यात आलेल्या 5,760 कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नवीन

तुमच्या ट्रेन तिकिटावर 'NOBS' असे लिहिलेले का? मुलांचे तिकीट बुक करण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम

थायलंडच्या ईशान्य भागात भीषण अपघात 9 बौद्ध भिक्षूंचा मृत्यू

मुंबईत मुसळधार पावसा रेड अलर्ट जारी; सोसाट्याचे वारे आणि समुद्राच्या उंच लाटांचा इशारा

आग्र्यामध्ये पत्नीने पतीची हत्या करून मृतदेह बाथरूममध्ये पुरला आणि त्यावर फरशा बसवल्या

LIVE: दुधात भेसळ करताना आढळ्यास १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाला सामोरे जावे लागेल

पुढील लेख
Show comments