आज सायंकाळी ४ वाजून ४३ मिनिटांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस भागात असलेल्या भानुशाली इमारतीचा भाग कोसळला. त्या ठिकाणी जो ढिगारा झाला त्या ढिगाऱ्याखालून आत्तापर्यंत सहाजणांना बाहेर काढण्यात आलं आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चारजण जखमी आहेत. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर खासदार अरविंद सावंत या ठिकाणी दाखल झाले. पोलीस आयुक्त आणि इतर मंडळीही घटनास्थळी दाखल झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी आले आहेत. त्यांनी या ठिकाणी नेमकं काय काय घडलं त्याची माहिती घेतली. पोलीस आयुक्तांशी त्यांनी चर्चा केली.
त्याचप्रमाणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथकं तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.